क्रीडा संकुलाच्या विविध विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा
क्रीडा संकुलाच्या विविध विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालयात
चर्चा
अकोला, दि. ११ : लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथील १४९ गाळे थकित
भाडेवसुली व आवश्यक कारवाई आणि हस्तांतरण, तसेच क्रीडा प्रबोधिनीच्या जागेचा परिसर
अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे
दिले.
जिल्हा क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा परिषदेच्या बैठकीत संकुलाबाबत
चर्चा करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. महापालिका उपायुक्त गीता ठाकरे, जिल्हा
क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, क्रीडा अधिकारी मनीषा ठाकरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी
रतन सिंग पवार, पोलीस उपनिरीक्षक गोविंद साबळे आदी उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संकुल समिती अंतर्गत असलेले एफडीचे रोखीकरण, गाळे थकित
भाडेवसुली, आवश्यकतेनुसार कारवाई व हस्तांतरणाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालयांतर्गत क्रीडा प्रबोधिनीच्या म्हैसपूर येथील जागेवरचे अतिक्रमण
काढण्याबाबत निर्देश देण्यात आले.
००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा