तेल्हारा तालुक्यात पाणलोट यात्रेचे स्वागत
तेल्हारा तालुक्यात
पाणलोट यात्रेचे स्वागत
अकोला, दि. ३ : मृद व
जलसंधारण विभागातर्फे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत आयोजित पाणलोट यात्रेचे तेल्हारा
तालुक्यात चित्तलवाडी व खंडाळा येथे शुक्रवारी उत्साहात स्वागत करण्यात आले. आमदार
प्रकाश भारसाकळे यावेळी उपस्थित होते.
जलसंवर्धन व कृषी सिंचन
काळाची गरज असून, पाणलोट यात्रेच्या माध्यमातून त्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी योगदान
देण्याचे आवाहन आमदार श्री. भारसाकळे यांनी केले. जिल्हा जलसंवर्धन अधिकारी अमोल मस्कर,
उपविभागीय जलसंधारण अधिकारी सचिनकुमार वानरे, सचिन गवई, मनोहरराव फाफट, सरपंच सिंधुताई
वानखडे, गजानन वानखडे आदी उपस्थित होते. यावेळी श्री. मस्कर यांनी जलसंधारणाची कृषी
उत्पादकता वाढण्यासाठी उपयुक्तता याबाबत मार्गदर्शन केले.
यात्रेनिमित्त आयोजित
विविध स्पर्धांचे बक्षीसवितरणही यावेळी झाले. पाणलोट योद्धा व धरिणीताई यांचा सत्कार
करण्यात आला. विशाल राखोंडे व त्यांच्या सहका-यांनी वासुदेव व गोंधळी वेशभूषेत लोककला
सादर करून नागरिकांचे प्रबोधन केले. मान्यवरांचे वृक्ष देऊन स्वागत झाले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा