‘जीडीसीए’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

 

 

‘जीडीसीए’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

अकोला, दि. ३ : जी. डी. सी. अँड ए आणि सीएचएम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ७ मार्चपर्यंत  वाढविण्यात आली आहे.

शासकीय सहकार व लेखा पदविका (जीडीसी अँड ए), तसेच सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सीएचएम)  परीक्षा दि. २३, २४ व २५ मे रोजी होणार आहेत. परीक्षेसाठी gdea.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दि. ७ मार्च रोजी रा. ८ वाजेपर्यंत भरता येईल. बँकेत चलनाने भरणा करण्याची मुदत दि. १३ मार्च रोजी बँकेच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत करण्यात आली आहे. अकोला येथील परीक्षा केंद्रावर अकोला, वाशिम, बुलडाणा हे तीन जिल्हे संलग्न आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम