दुय्यम निबंधक कार्यालय २९ ते ३१ मार्च सुरु राहणार
दुय्यम निबंधक कार्यालय २९ ते ३१ मार्च सुरु राहणार
अकोला, दि. २७ : वार्षिक बाजारमुल्य दर तक्ते दरवर्षी १ एप्रिल रोजी
प्रसिद्र होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची
गर्दी होत असते. तसेच महत्वाच्या सणांमुळे देखील दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात
पक्षकारांची गर्दी वाढत आहे. हे लक्षात घेऊन आर्थिक वर्ष २०२४-२५ या वर्षाचा इष्टांक
पुर्ण करण्याच्या दुष्टीने दि. २९ मार्च या आर्थिक वर्ष अखेर असलेल्या सुटीच्या दिवसात
सर्व नोंदणी कार्यालये सुरु ठेवण्यात येणार आहे. तरी सर्व जनेतेने या सुविधेचा लाभ
घ्यावा असे आवाहन आर. पी. भालेराव प्र.सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी
अकोला यांनी केलेले आहे.
००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा