सणांनिमित्त जिल्ह्यात कलम ३६ लागू

 

सणांनिमित्त जिल्ह्यात कलम ३६ लागू

अकोला, दि. १२ : होळी (१३ मार्च), धुळिवंदन (१४ मार्च), तसेच तिथीनुसार साजरी करण्यात येणारी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती (१७ मार्च) आदी सण- उत्सव लक्षात घेऊन जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३६ नुसार आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी आदेश जारी केला.

विहित मार्गाने मिरवणूक, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता व बंदोबस्त, ध्वनीक्षेपक वापर मर्यादा, जमाव शिस्त व नियंत्रण आदींसाठी पोलीस फौजदार व त्याहून वरिष्ठ अधिका-यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सार्वजनिक व सुरक्षितता नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्तीवर कलम १३४ नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम