प्रत्येक तालुका क्रीडा संकुलासाठी तीन कोटींच्या प्रस्तावाला मान्यता पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचा पुढाकार

  तालुका स्तरावर निर्माण होणार अद्ययावत क्रीडा संकुल

प्रत्येक तालुका क्रीडा संकुलासाठी

तीन कोटींच्या प्रस्तावाला मान्यता

पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचा पुढाकार

अकोला, दि. २६ : जिल्ह्यातील प्रत्येक तालुका क्रीडा संकुलासाठी प्रत्येकी ३ कोटी रू. निधीच्या प्रस्तावाला राज्य क्रीडा विकास समितीने मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलांचा अनुशेष दूर व्हावा यासाठी राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी पुढाकार घेऊन क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्रान्वये निधीची मागणी केली. ती पूर्ण झाल्याने आता तालुक्यातील खेळाडू, क्रीडाप्रेमींना हक्काचे आणि विविध अद्ययावत सुविधांनी युक्त क्रीडांगण उपलब्ध होणार आहे.


अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, पातूर, बाळापूर येथे तालुका क्रीडा संकुलांच्या विकासासाठी प्रत्येकी ३ कोटी निधी मिळण्यासाठी व याबाबतचा अनुशेष दूर होण्यासाठी पालकमंत्री ॲड. फुंडकर यांनी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्रान्वये मागणी केली. त्यानुसार राज्य क्रीडा विकास समितीच्या माध्यमातून या निधीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.  

जिल्ह्यात इनडोअर व आऊटडोअर क्रीडा प्रकारांमध्ये अनेक खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. क्रीडा संकुलांसाठी निधी मिळाल्याने ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना हक्काचे स्टेडियम मिळणार आहे. याद्वारे जिल्ह्यात खेळांना पोषक असे वातावरण तयार होईल, असा विश्वास पालकमंत्री ॲड. फुंडकर यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची मागणी पूर्ण झाल्याने क्रीडा क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम