नीट व इतर परीक्षांच्या तयारीसाठी आदिवासी उमेदवारांना विनामूल्य प्रशिक्षण
नीट व इतर परीक्षांच्या तयारीसाठी आदिवासी उमेदवारांना
विनामूल्य प्रशिक्षण
अकोला, दि. २७ : एकात्मिक आदिवासी
विकास प्रकल्पातर्फे अकोला, वाशिम, बुलढाणा या तीन जिल्ह्यांतील इयत्ता 10 वी उत्तीर्ण
होणा-या अनुसूचीत जमातीच्या विद्यार्थ्यांना नीट व सीईटी-जेईई आदी परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी
प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणार्थींची निवड चाळणी परीक्षेद्वारे होईल. त्यानुसार सर्व शासनमान्यता
प्राप्त शासकीय,अनुदानित, विनाअनुदानित शाळा,आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या शासकीय,
अनुदानित आश्रमशाळा आदी शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील मार्च 2025 मध्ये
इयत्ता 10 वी ची परीक्षा दिलेल्या व शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये इयत्ता 9 वी मधील
गुणानुक्रमे प्रथम पाच मुले व प्रथम पाच मुली यांचे आवेदनपत्र प्रकल्प कार्यालय, एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प, अकोला, न्यू राधाकिसन प्लॉट, महसूल भवन अकोला. येथे दि.9 एप्रिलपर्यंत
सादर करावेत. अर्जाचे नमुने शिक्षणाधिकारी,
(माध्यमिक) जिल्हा परिषद व शासकीय, अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात
आले आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सदर परीक्षेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्रकल्प
अधिकारी, मोहनकुमार ग. व्यवहारे यांनी केले आहे.
००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा