माजी सैनिक संवर्गातून ‘मेस्को’तर्फे कर्मचारी भरणार

 

माजी सैनिक संवर्गातून ‘मेस्को’तर्फे कर्मचारी भरणार

अकोला दि. 13 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून अशासकीय लिपीक टंकलेखकाची जागा तात्पुरत्या मानधनावर ‘मेस्को’च्या माध्यमातून भरण्यात येत आहे. माजी सैनिक किंवा दिवंगत सैनिकाच्या पत्नी यांना अर्ज करता येईल. इच्छूकांनी १७ मार्चपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील रोजगार पटावर नोंदणी केलेल्या माजी सैनिक किंवा दिवंगत सैनिकांच्या पत्नी आदींकडून माजी सैनिक संवर्गातून महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळामार्फत अशासकीय लिपिक टंकलेखक या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. हे पद अशासकीय, तात्पुरत्या स्वरुपाचे व एकत्रित मानधनावर आहे.

पदासाठी मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटाला किमान ३० शब्द असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र, तसेच महाराष्ट्र शासनाचे एमएससीआयटी प्रमाणपत्र धारण केलेले असावे किंवा मराठी टंकलेखन येणे अनिवार्य राहील.

इच्छुक माजी सैनिक, दिवंगत सैनिकांच्या पत्नी आदींनी आपले अर्ज, सैन्य सेवा पुस्तक, आधार कार्ड, दोन छायाचित्र व कागदपत्रासह दि. १७ मार्चपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अकोला येथे सादर करावेत. या संधीचा लाभ घ्यावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद शरद पाथरकर यांनी कळविले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम