जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या कार्यालयाचा शुभारंभ
जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या कार्यालयाचा शुभारंभ
अकोला, दि २४ : अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत जैन अल्पसंख्यांक आर्थिक
विकास महामंडळ कार्यालयाचा शुभारंभ महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे
सदस्य ललित गांधी यांच्या हस्ते आज झाले. जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी
अधिकारी वैष्णवी बी, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे,
महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक ज्योती भगत आदी उपस्थित होते.
शहरातील बळवंत कॉलनी परिसरात हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. जैन
अल्पसंख्यांक विकास आर्थिक महामंडळाद्वारे समाजातील युवक वर्गाला, होतकरू उद्योजक,
व्यावसायिक, महिलाभगिनी आदींसाठी विविध योजना राबविल्या जातात. जिल्हा कार्यालयाच्या
माध्यमातून जिल्ह्यातील गरजूंपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचावा, असे श्री. गांधी यांनी
सांगितले. श्रीमती भगत यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा