‘माविम’तर्फे शुक्रवारपासून नवतेजस्विनी जिल्हा महोत्सव

  

‘माविम’तर्फे शुक्रवारपासून नवतेजस्विनी जिल्हा महोत्सव

अकोला, दि. १९ : महिला व बालविकास विभाग, तसेच महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत नविन बसस्थानकासमोरील स्वराज्यभवन परिसरात ‘नवतेजस्विनी जिल्हा महोत्सव- 2025’ चे आयोजन करण्यात आले आहे, बचत गटांच्या उत्पादनांची विक्री व प्रदर्शन असे त्याचे स्वरूप असून, महोत्सवाची सुरूवात शुक्रवार, दि. 21 मार्च रोजी सकाळी  १० वाजता होणार आहे.

जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या भगिनींनी निर्माण केलेल्या विविध वस्तू या महोत्सवाच्या माध्यमातून अकोलेकरांना उपलब्ध होणार आहेत. हा महोत्सव 23 मार्चपर्यंत रोज सकाळी 10 ते रात्री 10 वा. दरम्यान सर्वांसाठी खुला आहे. 

 ग्रामीण महिलाभगिनींनी तयार केलेल्या अनेकविध सुंदर वस्तू, पदार्थ, उत्पादने पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी या उपक्रमाला अकोलेकरांनी भेट द्यावी, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा समन्वयक वर्षा खोब्रागडे यांनी केले.  

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम