जात पडताळणी अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी ८ एप्रिलला शिबिर

 

जात पडताळणी अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी ८ एप्रिलला शिबिर

 

अकोला, दि. २७ :  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने दि. ८ एप्रिल रोजी जात पडताळणी अर्जांतील त्रुटींची पूर्तता करून घेण्यासाठी विशेष त्रुटी पूर्तता व अर्ज स्वीकृती शिबिर आयोजिण्यात आले आहे.  

शिबीराचा लाभ घेण्यासाठी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ११ वी, १२ वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची जात वैधता प्रमाणपत्राच्या अभावी त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व पुढील शिक्षणापासुन वंचित राहू नये त्याकरिता विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी हे शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

तसेच अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी सन २०२५-२६ या वर्षात जेईई, नीट, सी.ई.टी अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरलेले आहे. अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात पडताळणी समितीकडे त्यांचे जातीदावा प्रकरण दाखल केलेले आहे.

परंतु जातीदावा प्रकरणातील कागदपत्रे पुरावा अभावी त्रुटी आढळुन आल्याने अद्यापपर्यंत ही ज्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही. अशा विद्यार्थी- विद्यार्थीनी दि. ८ एप्रिलपूर्वी विशेष मोहिम शिबीराच्या दिवशी कार्यालयीन वेळेत समितीकडे दाखल केलेल्या जातीदावा प्रकरणांची पावती व त्रुटी पुर्ततेच्या मूळ कागदपत्रांसह समिती कार्यालयात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समिती अध्यक्ष जितेंद्र सा. काकुस्ते, उपायुक्त अमोल मो. यावलीकर व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मनोज मेरत यांनी केले आहे.

समिती कार्यालयाचा पत्ता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, अकोला असा आहे. 

                                         ००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम