बेरोजगारांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशीप योजना इच्छूकांनी ३१ मार्चपूर्वी अर्ज करावा - सहायक रोजगार आयुक्त
बेरोजगारांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशीप योजना
इच्छूकांनी ३१ मार्चपूर्वी अर्ज करावा
-
सहायक रोजगार आयुक्त
अकोला, दि. १८ : प्रधानमंत्री इंटर्नशीप योजनेद्वारे सुशिक्षित बेरोजगारांना
मोठ्या कंपन्यांत इंटर्नशीपची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी दि. ३१ मार्चपूर्वी अर्ज
करण्याचे आवाहन रोजगार सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले.
वय २१ ते २४, आयटीआय किंवा पदविका किंवा कोणतीही पदवी, तसेच कुटुंबाचे
उत्पन्न ८ लाख रू. च्या आत असल्यास पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन अर्जासाठी
‘पीएमइंटर्नशिप.एमसीए.जीओव्ही.इन’ असा संकेतस्थळाचा
पत्ता आहे.
ऑटोमोबाईल, गॅस, बँकिंग, हॉस्पिटॅलिटी, एफएमसीजी यासह २४ प्रमुख उद्योगांतील
कंपन्यांत व्यावसायिक अनुभवाची संधी तरूणांना मिळेल, तसेच दरमहा सहा हजार रू. आणि प्रधानमंत्री
जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत संरक्षण प्रदान केले जाईल.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा