भारक्षमतेहून अधिक वाहतूक करणा-या वाहनांवर ‘आरटीओं’ची कारवाई

भारक्षमतेहून अधिक वाहतूक करणा-या

वाहनांवर ‘आरटीओं’ची कारवाई

 

अकोला, दि. ४ : भारक्षमतेहून अधिक माल वाहून नेणा-या मालमोटारी व जड वाहनांविरूद्ध प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून मोहिम उघडण्यात आली आहे. त्याअंतर्गत आज ३५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

मोहिमेच्या आजच्या पहिल्या दिवशी सुमारे २०० वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात ३५ वाहने भारक्षमतेहून अधिक माल वाहून नेत असल्याचे आढळले. त्यांच्यावर झालेल्या कारवाईत जमा झालेला एकूण १० लक्ष रू. महसूल शासनास जमा करण्यात आला आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या मार्गदर्शनात मोहिमेत सर्व मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, वाहनचालक यांचा सक्रिय सहभाग आहे. मोहिमेसाठी ४ कोटी रू. लक्ष्यांक असून, फेब्रुवारीपर्यंत ६० टक्के पूर्तता झाली आहे.

सर्व वाहनधारकांनी आपली सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवावी. वाहने चालविताना मोटार वाहन कायद्याचे पालन करावे. वाहनात क्षमतेपेक्षा जास्त वजनाचा माल भरू नये. वाहन तपासणीदरम्यान विभागाच्या नावावर वाहनधारकांनी वेठीस धरून गैरफायदा घेणा-या व्यक्तींच्या विरोधात कार्यालयात तत्काळ तक्रार दाखल करावी. वाहनचालक, मालक यांनी असामाजिक घटकांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. वाहन तपासणी मोहिम पश्चिम व-हाडातील अकोला, वाशिम व बुलडाणा या तिन्ही जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याचे श्री. भुयार यांनी सांगितले.

०००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम