अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी १८ दिवसीय निवासी प्रशिक्षण

 

अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी १८ दिवसीय निवासी प्रशिक्षण  

अकोला, दि. 17 :  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे महाराष्ट्र उद्योजक, व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेत अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी 18 दिवसीय निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजिण्यात येत आहे.

वय १८ ते ४८ दरम्यान, तसेच किमान ८ वी उत्तीर्ण उमेदवारांना सहभागी होता येईल. शाळा सोडण्याचा दाखला. जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, तसेच अमरावती येथे निवासी राहण्याची तयारी असल्याचे पत्र आदी कागदपत्रांसह इच्छूकांनी अर्ज करावा. 

या प्रशिक्षण कार्यक्रमात उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योजकीय गुणसंपदा. शासकीय योजनेची माहिती, बँकेची कार्यप्रणाली, प्रकल्प अहवाल, मार्केटिंग व व्यवसायाला लागणारी माहिती याविषयी प्रशिक्षण तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रवेशासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र, चांडक बिछायत केंद्राच्या बाजूला दुर्गा चौक, अकोला यांच्याकडे दि. १९ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी कु. कल्याणी तिजारे यांच्याशी मो.नं. ९८२२३९१३३७ वर संपर्क साधावा.

०००  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम