बॅटरीवर चालणारा फवारणी पंप 100 टक्के अनुदानावर

 

बॅटरीवर चालणारा फवारणी पंप 100 टक्के अनुदानावर

अकोला, दि. 31 : बॅटरी संचालित फवारणी पंप 100 टक्के अनुदानावर देण्यात येत असून, जिल्ह्यातून अधिकाधिक शेतक-यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेत बॅटरीवर चालणारा फवारणी पंप वैयक्तिक तत्वावर शेतक-यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिका-यांशी संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज