अकोला पूर्व मतदारसंघातील मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण

 

अकोला पूर्व मतदारसंघातील मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण

अकोला, दि. 29 : अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील 6 मतदान केंद्रातील मतदारांची संख्या वाढल्याने त्यांना लगतच्या मतदान केंद्रावर स्थलांतरित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, 11 मतदान केंद्राच्या इमारती जीर्ण झाल्याने ही मतदान केंद्रे सुस्थितीतील इमारतीत स्थलांतरित करण्यात आली आहे, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी दिली.

उमरी येथील विठ्ठलनगर येथील जि. प. प्राथमिक मराठी शाळा क्र. 2 येथील मतदान क्र. 139 मधील 125 मतदार तिथल्याच मतदान केंद्र 140 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. रणपिसेनगर येथील जागृती विद्यालयातील मतदान केंद्र 191 वरील 309 मतदार त्याचठिकाणी असलेल्या केंद्र 203 मध्ये समाविष्ट केले आहेत. त्याचप्रमाणे, सीताबाई कला महाविद्यालय येथील म. कें. 215 मधील 190 मतदार क्र. 213 मध्ये, समता विद्यालय, भौरद येथील क्र. 242 मधील 256 मतदार क्र. 239 मध्ये, खडकी जि. प. मराठी शाळेतील क्र. 285 मधील 91 मतदार क्र. 286 मध्ये आणि शिवणी येथील हनुमंत मराठी प्रा. शाळेतील क्र. 296 मधील 190 मतदार क्र. 297 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

 

जुनी इमारत असल्याने मतदान केंद्राची ठिकाणे बदलली

टाकळी खु. येथील ग्रामपंचायत कार्यालयातील 35 व 36 ही मतदान केंद्रे तेथील जि. प. मराठी शाळेत, रोहणा येथील जि. प. प्राथ. मराठी शाळेतील केंद्र क्र. 66 शाळेच्या पश्चिमेकडील नवीन इमारतीत, आपातापा येथील जि. प. मराठी शाळेतील केंद्र क्र. 84 हे तेथील अंगणवाडी इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे.

खडकी येथील पंजाबराव पाटील काळे विद्यालयातील 280, 281. 289 व 290 ही मतदान केंद्रे विद्यालयाच्या परिसरातील नवीन इमारतीत हलविण्यात आली आहेत. चांदूरमधील जि. प. प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र क्र. 326, 327 व 328 ही केंद्रे जि. प. वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळेत स्थलांतरित करण्यात आली आहेत.

०००   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज