छायाचित्र मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम

छायाचित्र मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम

अकोला, दि. 12 : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

 त्यानुसार मंगळवार दि. 25 जून ते बुधवार दि. 24 जुलै या कालावधीदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन  पडताळणी करतील. मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण, मतदार तसेच एपिकमधील तफावत दुर करणे, अस्पष्ट, निकृष्ट दर्जाची छायाचित्रे बदलुन चांगल्या प्रतीची छायाचित्रे सुनिश्चित करणे, आवश्यक असेल तेथे बदलून प्रतिमा गुणवत्तेत सुधारणा करणे. विभाग, भागांची पुनर्रचना करणे आणि विभाग, भाग सिमांच्या प्रस्तावित पुनर्रचनेचे अंतिम रूप देणे आणि मतदान केंद्रांच्या यादीची मान्यता घेणे. कंट्रोल चार्ट अपलोड करणे. दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी तयार करणे आदी कामे होतील.  

पुनरिक्षण कार्यक्रमानुसार गुरूवार दि. 25 जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होईल. दि. 25 जुलै ते दि. 9 ऑगस्ट हा प्रारुप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याचा अवधी आहे. त्याचप्रमाणे, दि. 27 जुलै, 28 जुलै, 3 ऑगस्ट व 4 ऑगस्ट रोजी मतदार नोंदणी विशेष शिबीर घेण्यात येणार आहे. दि. 19 ऑगस्ट रोजी प्राप्त दावे व हरकती निकाली काढणे. मतदार यादीची सुक्ष्म तपासणी करणे व अंतिम प्रसिद्धीबाबत भारत निवडणूक आयोगाची परवानगी घेणे, डाटाबेस अद्ययावत करणे व पुरवणी मतदार यादी छपाई करणे. दि. 20 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ  यांनी कळविले आहे.

 ००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज