ज्येष्ठांनी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा लाभ घ्यावा - समाजकल्याण सहायक आयुक्त मंगला मून

 ज्येष्ठांनी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा लाभ घ्यावा

-        समाजकल्याण सहायक आयुक्त मंगला मून

 

अकोलादि. 31 : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’द्वारे सहाय साधने किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी, तसेच प्रबोधन- प्रशिक्षणासाठी एकवेळ एकरकमी तीन हजार रु. खात्यात प्राप्त होतात. या योजनेसाठी पात्र व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून यांनी केले आहे.

 

राज्यातील  ६५ वर्ष व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणा-या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र याद्वारे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या शारीरिक अक्षमतेनुसार आवश्यक साधने, उपकरणे पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरित करण्यात येतात.

 त्यातून ज्येष्ठांना चष्मा, ट्रायपॉड, स्टीक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वायीकल कॉलर इत्यादी साधने खरेदी करता येतीलतसेच नोंदणीकृत योगोपचार केंद्र, मनःस्वास्थ्य केंद्र, मनःशक्ती केंद्रप्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल.

 

अर्जासोबत आधारकार्डमतदान कार्डराष्ट्रीयकृत बँकेची पासबुक झेरॉक्सपासपोर्ट आकाराची २ छायाचित्रेस्वयं घोषणापत्रशासनाने ओळखपत्र पाठविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न मर्यादा २ लाख)आवश्यक साहित्याबाबत वैद्यकीय अधिकारी यांचे शिफारसपत्र आवश्यक आहेत.

अर्जप्रक्रिया सध्या ऑफलाईन असून, अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा. पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरून जिल्हा समाजकल्याण अधिकारी जि.प. अकोला किंवा सहायक आयुक्त समाज कल्याण अकोला या कार्यालयास सादर करावे. असे आवाहन श्रीमती यांनी केले आहे.  

 ०००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज