पं. स. रिक्त पदाची पोटनिवडणूक निवडणूक क्षेत्रात आचारसंहिता

 

 

 

पं. स. रिक्त पदाची पोटनिवडणूक

निवडणूक क्षेत्रात आचारसंहिता

अकोला, दि. 22 : बाळापूर पंचायत समितीतील 77- बटवाडी बु. येथील रिक्त सदस्य पदासाठी  पोटनिवडणुक होणार असून, मंगळवारपासून (23 जुलै) दि. 29 जुलैपर्यंत सकाळी 11 ते दु. 3 या वेळेत बाळापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येत आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाळापूर उपविभागीय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाळापूर तहसीलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केला. निर्वाचक गणाच्या क्षेत्रात आचारसंहिता अंमलात आली असून, ती भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी दि. 30 जुलै रोजी सकाळी 11 वा. करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास रविवार, दि. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी बाळापूर तहसील कार्यालय येथे सोमवार, दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. करण्यात येईल.

 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा