जिल्ह्यातील सर्व शाळांत आज पायाभूत चाचणी

विद्यार्थ्यांचे गत वर्षातले अध्ययन तपासणार

जिल्ह्यातील सर्व शाळांत आज पायाभूत चाचणी

अकोला, दि. 9 : विद्यार्थ्यांनी गेल्या शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रम आत्मसात केला किंवा कसे, हे तपासण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांतून इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी उद्या, दि. 10 ते 12 जुलैदरम्यान होणार आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य आर. पी. खडके यांनी केले आहे.

या चाचणीतील गुण शिक्षकांकडून विद्या समीक्षा पोर्टलवर भरले जातील. अपेक्षित गुण न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रम दिला जाईल. त्यातून पुढील इयत्तेच्या अभ्यासक्रमासोबत गत अभ्यासक्रमाचीही उजळणी घेण्यासाठी शिक्षकांना दिशा मिळणार आहे. इयत्ता तिसरी ते नववीतील विद्यार्थ्यांसाठी भाषा, गणित व इंग्रजी या विषयाच्या छापील प्रश्नपत्रिका पुरविण्यात आल्या आहेत. चाचणीदरम्यान ‘डाएट’ व जि. प. शिक्षण अधिकारी शाळांना भेटी देतील. विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीसाठी ही चाचणी होत असल्याचे श्रीमती खडके यांनी सांगितले.

००


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज