जिल्ह्यात पुढील सहा दिवस पावसाची शक्यता

 जिल्ह्यात पुढील सहा दिवस पावसाची शक्यता

अकोला, दि. 05 : नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात आजपासून दि. 11 जुलैपर्यंत विजांच्या कडकडांसह पाऊस होण्याची शक्यतता दर्शविली आहे.

पुरस्थितीच्या अनुषंगाने जिल्‍ह्यातील नागरिकांनी नदीमध्ये, नाल्यामध्ये पोहण्याचा प्रयत्न करू नये व पुर पाहण्यासाठी नदी-नाला काठावर जाऊ नये. विज व पावसापासून बचावाकरीता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्‍यात यावा. 

अशास्थितीत झाडाखली आश्रय घेऊ नये. पुरस्थितीत पुलावरून पाणी वाहत असतांना पुल, रस्ता ओलांडू नये. नदी नाला काठावर सेल्फी काढण्याचा मोह करू नये. वीज चमकतांना मोबाईल उपकरणे बंद ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज