वसतिगृहांत प्रवेश सुरू

 

इतर मागास बहुजन कल्याण वसतिगृहांत प्रवेश सुरू

अकोला, दि. 8 : इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे मुलांचे व मुलींचे अशी दोन 100 क्षमतेची वसतिगृहे चालविण्यात येतात. त्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, इच्छूकांनी 21 जुलैपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन सहायक संचालक डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

मुलींचे वसतिगृह संत तुकाराम चौकाजवळ माधवनगरात असून, मुलांचे वसतिगृह तापडियानगरात शुभमंगल बिर्ला रोड येथे आहे. चालू शैक्षणिक वर्षात उच्च शिक्षणासाठी व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. विद्यार्थ्यांना आरक्षण प्रवर्गनिहाय व इयत्ता बारावीचे गुण लक्षात घेऊन प्रवेश दिला जाईल. अर्ज सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, दक्षतानगर, निमवाडी, अकोला येथे उपलब्ध व स्वीकारण्यात येत आहेत.

मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश सुरू

सामाजिक न्याय विभागातर्फे शहरातील हनुमान वस्तीतील संतोषीमाता मंदिरानजिक असलेल्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश देणे सुरू आहे. इयत्ता 8 वी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थिनी प्रवेश घेऊ शकतात. अकोला शहराचे रहिवाशी नसलेल्या मात्र, येथील महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींनी अर्ज करण्याचे आवाहन गृहपाल ए. पी. चेडे यांनी केले आहे.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज