राष्ट्रीय सांख्यिकी दिन उत्साहात साजरा

 

राष्ट्रीय सांख्यिकी दिन उत्साहात साजरा

अकोला, दि. 4 : जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने थोर सांख्यिकीशास्त्रज्ञ पद्मविभूषण प्रो. प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सांख्यिकी दिन शनिवारी साजरा केला.

 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रा. आनंद टिंगरे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा नियोजन अधिकारी गि. के. शास्त्री, सांख्यिकी उपसंचालक अ. वि. सुने व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

सांख्यिकीचे विविध क्षेत्रातील महत्व व उपयुक्तता  याबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सध्याचा काळ हे ‘डेटा युग’ असून, विकासप्रक्रियेत सांख्यिकी अत्यंत मूलभूत असते. माहितीचे संकलन व विश्लेषण करण्यासाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालय महत्वाची भूमिका बजावते, असे श्री. टिंगरे यावेळी म्हणाले. सांख्यिकी सहायक गणेश प्र. वानखडे यांनी आभार मानले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज