गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान गुरूवारपासून प्रारंभ

 

 

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान

गुरूवारपासून प्रारंभ

अकोला, दि. 31 : विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीत आवश्यक सुधारणांसाठी दि. 1 ते 31 ऑगस्टदरम्यान शिक्षण खात्याकडून विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी सुचेता पाटकर यांनी आज दिली.

त्यात सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी, त्यातील अडथळ्यांचा विचार करुन, आवश्यकतेनुसार बदल करण्यास्तव क्षेत्रीय अधिका-यांमार्फत शाळांचे निरीक्षण व अहवाल सादर करण्यात येणार आहेत. त्यात पहिल्या २० दिवसात प्रत्यक्ष शाळाभेटी, त्यानंतरच्या ६ दिवसात आवश्यकतेनुसार सुधारणा, उपाययोजना, त्यानंतर ४ दिवसामध्ये अनुपालनाची खात्री करणे अशी कामे केली जातील.

 

आठवड्यातील प्रत्येक सोमवार व शुक्रवार हे दोन दिवस कार्यालयीन कामकाज सांभाळून उर्वरित दिवशी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तत्सम पदावरील अधिकारी यांच्याकडून शाळाभेटी केल्या जाणार आहेत. या तपासणीतून विद्यार्थ्यांपर्यंत विविध योजना योग्य प्रकारे पोहचत आहे काय याचा धांडोळा घेतला जाईल.  त्यानंतर शासनास्तरावरही या बाबींची फलनिष्पत्ती तपासण्यात येऊन सुधारणा करण्यात येतील, असे श्रीमती पाटेकर यांनी सांगितले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज