लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अकोला, दि. 22 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत मातंग व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जाते.  त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिका व इतर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थी योजनेत पात्र आहेत. सरासरी 60 टक्के व त्याहून अधिक गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांना उपलब्ध निधीनुसार शिष्यवृत्ती देण्यात येते.

अर्जासह जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, शिधापत्रिका, आधारपत्र, पासपोर्ट आकारातील दोन छायाचित्रे, गुणपत्रिका, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याबाबतचे बोनाफाईड प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. इच्छूकांनी दि. 24 जुलैपूर्वी जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, कौलखेड रस्ता, नालंदानगरच्या पाटीजवळ, आरोग्यनगर चौक, अकोला या पत्त्यावर

दोन प्रतीत अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आनंद वाडिवे यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज