ग्रा. पं. सरपंच निवडणूक आरक्षणासाठी दि. 12 जुलै रोजी सोडत

 ग्रा. पं. सरपंच निवडणूक आरक्षणासाठी दि. 12 जुलै रोजी सोडत

 

अकोला, दि. 4 : नजिकच्या काळात निवडणूक होणा-या 20 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात दि. 12 जुलै रोजी सकाळी 11 वा. होणार आहे.

        अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग आदी आरक्षणासाठी ही सोडत होईल. दि. 4 मार्च 2025 पर्यंत निवडणूक होणा-या ग्रामपंचायतींचा सोडतीत समावेश आहे. यावेळी तहसीलदार व गटविकास अधिकारी उपस्थित राहतील. संबंधित ग्रामपंचायतींच्या नागरिकांनीही उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

तेल्हारा तालुक्यातील उमरी व अकोली रूपराव, अकोट तालुक्यातील केळपाणी व केळपाणी बु., मूर्तिजापूर तालुक्यातील कव्हळा, शेलू बाजार, किनखेड व लंघापूर, बाळापूर तालुक्यातील हिंगणा निंबा व शिंगोली, बार्शिटाकळी तालुक्यातील भेंडीसूत्रक व चोहोगाव, पातूर तालुक्यातील सांगोळा, कोठारी बु., आस्टुल, भंडारज बु. व तुलंगा बु., अकोला तालुक्यातील आखतवाडा, अनकवाडी, तसेच मजलापूर अशा एकूण 20 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी सोडत होणार आहे.

०००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम