जिल्ह्यात साजरा होणार महसूल पंधरवडा प्रत्येक उपक्रम नियोजनपूर्वक यशस्वी करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे आदेश






जिल्ह्यात साजरा होणार महसूल पंधरवडा

प्रत्येक उपक्रम नियोजनपूर्वक यशस्वी करा

-         जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे आदेश

अकोला, दि. 30 : महसूल विभागामार्फत अकोला जिल्ह्यात दि. 1 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत ‘महसूल पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. महसूल पंधरवड्यानिमित्त प्रत्येक उपक्रम सर्व तालुक्यांत नियोजनपूर्वक व समन्वयाने यशस्वी करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.

पंधरवड्याच्या पूर्वतयारीसाठी नियोजनभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, महसूल उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव व विविध अधिकारी उपस्थित होते.

 पंधरवड्याचा शुभारंभ महसूलदिनी अर्थात दि. 1 ऑगस्ट रोजी होईल. यादिवशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत विशेष उपक्रम घेतला जाईल. दि. 2 ऑगस्ट रोजी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’, दि. 3 ऑगस्ट रोजी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ या योजनांबाबत कार्यक्रम होतील. दि. 4 ऑगस्ट रोजी ‘स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय’ हा उपक्रम राबविण्यात येईल. दि. 5 ऑगस्ट रोजी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’, दि. 6 ऑगस्ट, रोजी ‘एक हात मदतीचा- दिव्यांगांच्या कल्याणाचा’ हा कार्यक्रम होईल. दि. 7 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण केले जाईल.

पहिल्या टप्प्यातील या कार्यक्रमानंतर या विविध योजनांबाबत पुढील आठवड्यातही सलग विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत कार्यक्रम घेतले जाईल. जिल्ह्यात पंधरवड्यात विविध प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यासाठी शिबिरे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशा विविध योजनांसाठी लागणारी, तसेच सैनिकांना व दिव्यांगांना आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यासाठी विशेष शिबिरे घ्यावीत. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करावा, दिव्यांगांना विविध योजनांच्या लाभाच्या अनुषंगाने शिबिर आयोजित करून स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने आवश्यक उपकरणे मिळवून द्यावीत, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

विविध मान्यवर व अधिकाधिक नागरिकांचा सहभाग मिळवून महसूल सप्ताह यशस्वीपणे साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

०००

                  

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज