मूकबधिर विद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू

 

मूकबधिर विद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू

अकोला, दि. 4 : येथील मलकापूर परिसरातील शासकीय मुकबधिर विद्यालयात इयत्ता 1 ली  ते  7 वीपर्यंतच्या मुलांसाठी प्रवेश प्रक्रिया दि. 31 जुलैपर्यंत सुरू राहील. विद्यालयात अर्ज उपलब्ध आहेत.

विद्यार्थी कर्णबधीर व जिल्हा शल्य चिकित्सकांचे 40 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र हवे. वय 6 ते 16 वर्षांपर्यंत असावे. एकापेक्षा जास्त अपंगत्व नसावे. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थ्यांना विनामुल्य प्रवेश मिळेल. निवास, भोजन, अंथरूण, पांघरूण, शालेय साहित्य आदी विनामूल्य पुरविले जाईल. अधिक माहितीसाठी 9028395441 किंवा 9850779260 किंवा 8888694370 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

                                                        00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज