समाजकल्याण वसतिगृहांत प्रवेश सुरू

 



अकोला, दि. ९ : अकोला व बार्शीटाकळी येथील मागासवर्गिय मुलांचे शासकीय वसतिगृहात इयत्ता 8 वी ते पदवीपर्यंत व पदवीनंतरच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू आहे.

अकोला व बार्शिटाकळी या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना टक्केवारीनुसार व शासन निर्णयानुसार वसतिगृहात रिक्त असलेल्या जागेवर प्रवेश देणे सुरु आहे. प्रवेश अर्ज कार्यालयीन वेळेत मिळतील.  


शालेय विद्यार्थी वर्ग 8 ते 10 वी  अर्ज करावयाचा कालावधी दि.10 जुलैपर्यंत, विद्यालयीन विभाग वर्ग 11 ते 12 वी करीता 31 जुलै पर्यंत व महाविद्यालयीन विभाग 12 वी व पदवी नंतरचे अभ्यासक्रमासाठी  31 जुलैपर्यंत करावयाचा आहे.

प्रवेश अर्ज शासनामार्फत मोफत पुरविण्यात येत असून कार्यालयीन वेळेत कार्यालयात येऊन अर्ज भरून देण्यात यावे. अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे खालील प्रमाणे आहे.  शाळा सोडल्याचा दाखला, चालू आर्थीक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला,  आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक, गुणपत्रीका, रहिवाशी दाखला इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत सादर करावी.

वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना
राहण्याची उत्तम सुविधा, भोजन व नास्ता, स्टेशनरी भत्ता, गणवेश भत्ता, मासिक निर्वाह भत्ता, अभ्यासिकेची सुविधा, ई – लायब्ररी, 24 तास इंटेरनेट सुविधा, वॉटर फिल्टर पिण्याचे पाणी, गरम पाणी सुविधा, जिम सुविधा, स्पोर्ट सुविधा दिल्या जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, हनुमान वस्ती, संतोषी माता मंदिर जवळ, अकोला व मागासवर्गिय मुलांचे शासकीय वसतीगृह, भारतीय स्टेट बँक जवळ, बार्शिटाकळी, संपर्क  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, अकोला येथील गृहपाल, मो. 830 805 8833 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज