‘जिल्हा होमगार्ड’ मध्ये 151 जागांची भरती

 

‘जिल्हा होमगार्ड’ मध्ये 151 जागांची भरती

अकोला, द‍ि.29 :  जिल्हा होमगार्डमधील रिक्त 151 जागा भरण्यासाठी होमगार्ड सदस्य नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छूकांनी 16 ऑगस्टपूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांनी केले आहे.

होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक, नियम आदी विस्तृत माहिती maharashtracdhg.gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. होमगार्डमध्ये निष्काम सेवा करू इच्छिणा-या अकोला जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणीसाठी अर्ज करावा. कागदपत्र तपासणी व शारिरीक व मैदानी चाचणीची  माहिती संकेतस्थळावर दि. 16 ऑगस्टपर्यंत प्रकाशित होईल.   

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम