‘स्वीप’अंतर्गत मतदार जागृती कार्यक्रमांना वेग

 

‘स्वीप’अंतर्गत मतदार जागृती कार्यक्रमांना वेग

अकोला, दि.  29  : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात ‘स्वीप’अंतर्गत मतदार जागृती कार्यक्रमांना वेग देण्यात आला आहे.

मतदार नोंदणी कार्यालयातर्फे नुकतेच श्री शिवाजी महाविद्यालय, तसेच मुलींचे आयटीआय येथे मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. जिल्हाधिकारी अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी,  उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव यांच्या मार्गदर्शनात ठिकठिकाणी कार्यक्रम होत आहेत.

मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य ठोकरे होते. तहसीलदार पी. झेड. भोसले, नझूल तहसीलदार दिनेश सोनोने, श्याम राऊत, गोपाळ सुरे, सुरेश पोते, विकास राठोड, रेखा रोडगे, श्रीमती गोपनारायण उपस्थित होते.

श्री शिवाजी महाविद्यालयात  प्राचार्य अंबादास कुलट यांच्या मार्गदर्शनात व डॉ. अस्मिता बढे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती भालेराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दोन्ही कार्यक्रमात नवमतदार प्रतिज्ञा घेण्यात आली. बालाजी रणेर यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश पोते यांनी आभार मानले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज