ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

 

अकोला, दि. १० : जिल्ह्यात 20 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तसेच  विविध कारणांनी सदस्य किंवा सरपंच पदे रिक्त झालेल्या 66 ग्रामपंचायतींत पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करून संबंधित ग्रामपंचायतींच्या नोटीसबोर्ड व तहसील कार्यालय स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे 97 सदस्य व 5 थेट सरपंच अशा पदांची पोटनिवडणूक होणार आहे. डिसेंबर 2024 पर्यंत मुदत संपणाऱ्या 20 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होईल.

 

पोटनिवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम

ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या अतिरिक्त ठरणा-या जागांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

 

कार्यक्रमानुसार, सोडत काढणे आवश्यक असल्यास विशेष ग्रामसभेची सूचना दि. 11 जुलै रोजी देणे आवश्यक आहे. विशेष ग्रामसभेमध्ये सर्वसाधारण जागा निश्चित करण्यासाठी दि. 15 जुलै रोजी सोडत काढणे, तसेच मागासवर्ग प्रवर्गाची रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करणे व तशा प्रसिद्धीची तारीख दि. 16 जुलै आहे. याबाबत तालुका व ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्धी करून पुढील कार्यवाही करावी, असे आदेश उपजिल्हाधिकारी डॉ. शरद जावळे यांनी तहसीलदार व गटविकास अधिका-यांना दिले आहेत. 

०००

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज