मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजना शिधापत्रिकेचे काम मार्गी लागण्यासाठी शनिवार व रविवारीही कार्यालय सुरू ठेवणार - जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजना

शिधापत्रिकेचे काम मार्गी लागण्यासाठी शनिवार व रविवारीही कार्यालय सुरू ठेवणार

-          जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड

अकोला, दि. 12 : महिलाभगिनींच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी शासनाकडून ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ ही योजना महाराष्ट्रात व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने शिधापत्रिकेसंबंधी कामकाजासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. अधिकाधिक महिलाभगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी पुरवठा कार्यालय सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांनी आज दिली.

ते म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही योजना महिलाभगिनींच्या आर्थिक स्वातंत्र्य व सन्मानासाठी शासनाकडून राज्यभर राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अनुषंगाने शिधापत्रिकासंबंधित कामकाजासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. अधिकाधिक महिलाभगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कार्यालय दि. 13 जुलै व दि. 14 जुलै रोजी कार्यालयीन वेळेत सुरू राहील. सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी या दिवशी उपस्थित राहून प्राधान्याने कामे पूर्ण करावी, असे आदेश श्री. माचेवाड यांनी दिले आहेत.

००० 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज