आदिवासी सुशिक्षित उमेदवारांना विनामुल्य स्पर्धापरीक्षापूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

 

 

आदिवासी सुशिक्षित उमेदवारांना विनामुल्य स्पर्धापरीक्षापूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

अकोला, दि. 12 : आदिवासी उमेदवारांकरीता परतवाडा (जि. अमरावती) येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राकडून विविध पदासाठी घेण्यात येणा-या स्पर्धा परिक्षेची विनामूल्य प्रशिक्षणाव्दारे तयारी करुन घेण्यात येते. त्यासाठी इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

प्रशिक्षण कालावधी दि.१ ऑगस्ट ते १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत असा साडेतीन महिन्यांचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा एक हजार रू. विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येतो.  

 

उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा . किमान वय १८ ते ३० चे दरम्यान असावे. उमेदवार किमान एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण असावा. रोजगार मार्गदर्शन केंद्र कार्यालयात नोंदणी केलेली असावी.

शाळा सोडल्याचा दाखला, उपविभागीय अधिकारीयांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, एस.एस.सी. उत्तीर्णची गुणपत्रिका, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयात नोंदणी प्रमाणपत्र, उमेदवाराचा पासपोर्ट फोटो आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

 

अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी अर्ज आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपुर कॅम्प, परतवाडा. ता अचलपूर. जि.अमरावती  या पत्त्यावर दि. ३० जुलैपर्यंत  सादर करावे.  याच ठिकाणी उमेदवार निवडीसाठी ३१ जुलै रोजी दु. 12 वा. मुलाखत होणार आहे.  अधिक माहितीसाठी संपर्क–07223-221205 किंवा ७७०९४३२०२४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

०००

                                                                                                              

                                                                                                            

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज