शेतीमाल विक्रीसाठी ई-समृद्धी पोर्टल

 

शेतीमाल विक्रीसाठी ई-समृद्धी पोर्टल

अकोला, दि. 10 : शेतीमाल विक्रीसाठी नाफेडच्या वतीने ई-समृद्धी पोर्टलची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. मका, तूर, हरभरा, उडीद व सोयाबीन विक्रीसाठी शेतकरी बांधवांनी ई- समृद्धी पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन ‘नाफेड’चे जिल्हा विपणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी केले आहे.

पोर्टलच्या प्रसिद्धीसाठी फेडरेशनकडून गावपातळीवर अभियान हाती घेण्यात आले आहे. शेतीमालाची एमएसपी दराने विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या पोर्टलवर नोंदणी करावी. कुठलीही अडचण आल्यास पोर्टलचे प्रतिनिधी दिनेश देशमुख यांच्याशी 9763344710 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज