दूध उत्पादक शेतकऱ्यांकरिता अनुदान योजना योजनेचा लाभासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 


दूध उत्पादक शेतकऱ्यांकरिता अनुदान योजना

 

योजनेचा लाभासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

            अमरावती : राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. या योजनेचा कालावधी 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यानुषंगाने योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ, खाजगी दूध प्रकल्प, दूध शितकरण केंद्र व फार्मर प्रोड्युसर कंपनी (दुग्धव्यवसायाशी संबंधित) आदींनी आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास विभाग, मुंबई यांच्याकडे दि. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी सचिन यादव यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 

शासनाने जाहिर केलेल्या गाय दुधाकरिता प्रतिलीटर पाच रुपये अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी सहकारी संघ, खाजगी दूध प्रकल्प, दूध शितकरण केंद्र व फार्मर प्रोड्यसर कंपनी (दुग्धव्यवसायाशी संबंधित) आदींनी विहीत नमुन्यातील अर्ज आयुक्त, दुग्धव्यसाय विकास विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे दि. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

 

अनुदान योजनेत सहभागी होणाऱ्या सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्प, दूध शितकरण केंद्र व फार्मर प्रोड्यसर कंपनी (दूग्धव्यवसायाशी संबंधित) यांनी डी.बी.टी. करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांचा आधारकार्डशी व पशुधनाच्या कानातील बिल्ल्याशी संलग्न (लिंक) करणे आवश्यक आहे. या योजनेत दूध उत्पादक शेतकरी दूध संघास किंवा खाजगी प्रकल्पास दूध पुरवठा करतात ते शेतकरी, सहकारी संघ किंवा खाजगी प्रकल्पांमार्फत तसेच दूध शितकरण केंद्र व फार्मर प्रोड्युसर कंपनी (दुग्धव्यवसायाशी संबंधित) योजनेत सहभागी होवू शकतात. अर्ज करणाऱ्या पात्र सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांचे डाटा अपलोड करण्यासाठी लॉगीन आयडी व पासवर्ड देण्यात येतील. या अगोदर योजनेत सहभागी प्रकल्पांना अगोदरच्याच लॉगीन आयडी व पासवर्ड व्दारे डाटा अपलोड करता येईल.

अमरावती महसूल विभागातील सर्व जिल्ह्यांतील  दुध उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, गाईच्या दुधासाठी (3.5 -8.5) या गुणप्रतीच्या संकलीत केलेल्या दुधास प्रतिलिटर रु. 5 अनुदान देण्याच्या योजनेस अटी व शर्तीच्या अधिन राहून दुध उत्पादक शेतकऱ्यांनी ते दुध पुरवठा करीत असलेल्या सहकारी संघ, खाजगी दूध प्रकल्प, दुध शितकरण ते दुध प्रोड्युसर कंपनी (दुग्ध्वव्यवसायीशी संबंधति) यांचेमार्फत आपला डाटा अपलोड करुन घ्यावा, व त्याचप्रमाणे गाय दुधाकरीता प्रतिलिटर 5 रु. प्रमाणे शासकीय अनुदान योजनेचा लाभ घ्यावा. तसेच संगणक प्रणालीमध्ये दुध उत्पादक शेतकऱ्यांचा डाटा भरणाऱ्या प्रकल्पांना देखील रु 0.05/- लिटर याप्रमाणे प्रोत्साहनपर रक्कम मिळणार असल्याने अमरावती विभागातील सहकारी संघ, खाजगी दूध प्रकल्प, दूध शितकरण केंद्र फार्मर प्रोड्युसर कंपनी (दुग्धव्यवसायाशी संबंधित) यांनी दुध उत्पादक शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळेल याकरीता प्रयत्न करावे, असे आवाहन प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी श्री. यादव यांनी केले आहे.

 

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज