आस्थापनांनी मनुष्यबळाबाबतची विवरणपत्रे सादर करावी रोजगार सहायक आयुक्तांचे आवाहन

 

आस्थापनांनी मनुष्यबळाबाबतची विवरणपत्रे सादर करावी

रोजगार सहायक आयुक्तांचे आवाहन

अकोला, दि. 3 : सार्वजनिक, तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी  सर्व

मनुष्यबळाबाबतची त्रैमासिक विवरणपत्रे ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.

 

आस्थापनांनी विहित नमुना ईआर-१ मध्ये नियमितपणे त्रैमासिक विवरणपत्र rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे जूनअखेर संपणा-या तिमाहीचे विवरणपत्र दि. 31 जुलैपूर्वी सादर करावे.  कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास akolarojgar@gmail.com या ई-मेल आयडी किंवा या कार्यालयाच्या ०७२४-२४३३८४९ या दुरध्वनी क्रमांकावर अथवा ८९८३४१९७९९ या भ्रमणध्वनी कमांकावर संपर्क साधावा.

           0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम