दिव्यांग नोंदणी शिबिराच्या माध्यमातून मतदार जनजागृती


दिव्यांग नोंदणी शिबिराच्या माध्यमातून मतदार जनजागृती

अकोला, दि. 30 : अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातर्फे मतदार जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत नुकतेच जि. प. कर्मचारीभवनात आयोजित दिव्यांग शिबिरातही मतदार जागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी दिव्यांग बांधवांनी मतदार प्रतिज्ञा घेऊन परिसरातील नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागृती करण्याचा संकल्प केला. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्या मार्गदर्शनात विस्तार अधिकारी मनोज बोपटे, सुनील बोंगीरवार, मोहिन अली, सचिन चव्हाण, शैलेश बगाटे यांनी आयोजनात योगदान दिले.

०००   



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा