‘महानेव्ही कनेक्ट 2024’चे अकोल्यात स्वागत भारतीय नौदलाला छत्रपती शिवरायांची प्रेरणा नौदल हे शौर्य व पराक्रमाचे प्रतीक - कॅप्टन इंद्रनील अवस्थी

  







‘महानेव्ही कनेक्ट 2024’चे अकोल्यात स्वागत

भारतीय नौदलाला छत्रपती शिवरायांची प्रेरणा

नौदल हे शौर्य व पराक्रमाचे प्रतीक - कॅप्टन इंद्रनील अवस्थी

अकोला, दि. 12 : छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे प्रेरणास्थान आहेत. भारतीय नौदलाची अतुलनीय कामगिरी ही जगभरात शौर्य व पराक्रमाचे प्रतीक ठरली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नौसेना कॅप्टन इंद्रनील अवस्थी यांनी आज केले.

भारतीय नौदलाबाबत विद्यार्थी, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने वसई येथून 8 जुलै रोजी नौदलातर्फे सुरू करण्यात आलेल्या महानेव्ही कनेक्ट कार रॅलीचे अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयात उत्साहात स्वागत करण्यात आले, त्यावेळी कॅप्टन अवस्थी यांनी युवकांशी संवाद साधला. प्राचार्य अंबादास कुलट यांच्यासह  अनेक मान्यवरांनी रॅलीचे स्वागत केले.

महाराष्ट्र नौसेना कॅप्टन इंद्रनील अवस्थी,कमांडर क्षितिज प्रसाद, सर्जन लेफ्टनंट कमांडर अर्शित आंग्रे, लेफ्टनंट कमांडर अक्षय रोझारिवो, लेफ्टनंट आस्था कंबोज, लेफ्टनंट अर्थव भोकारे, 11 महाराष्ट्र एनसीसी सुभेदार मेजर अशोक कुमार,अग्निवीर हर्षाली कोर,देवांशी कुळसंगे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व युवक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कॅप्टन अवस्थी यांनी यावेळी उपस्थितांना नौदलाचा इतिहास, कार्य, यंत्रणा, आतापर्यंत पार पाडलेल्या महत्वाच्या कामगिरी आदी विविध बाबींची माहिती दिली. नौदलात सेवेची संधी उपलब्ध असून, अधिकाधिक युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

ही कार रॅली वसई,नाशिक, धुळे,जळगाव अकोलामार्गे नागपुर, पुण्यासह 25 महत्वाच्या शहरांना भेट देत 4 हजार 210 किमीचे अंतर कापून विविध जिल्ह्यांत नौदलाचे कार्य, भूमिका, जबाबदारी, तसेच तरूणांना नौदलात सेवेची संधी आदींबाबत जनजागृती करीत आहे. ती महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यांना भेटी देणार असून समारोप मुंबई येथे होणार आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज