सर्तकतेचा इशारा; हलका ते मध्यम पर्जन्यमान

 


अकोला,दि.9(जिमाका)- हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार मंगळवार (दि. 14 सप्टेंबर) पर्यंतच्या कालावधीत  जिल्ह्यामध्ये लका ते मध्यम स्वरुपाचे पर्जन्यमान व एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.

नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदी, नाले, ओढे इत्यादी ठिकाणी पाऊस सुरु  असतांना किंवा पूर परिस्थिती असतांना पूर पाहण्यास गर्दी करु नये. पुलावरुन पाणी वाहत असतांना दुचाकीने किंवा प्रत्यक्ष जाण्याचे टाळावे. नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याच्या अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देण्यात यावा. तसेच  संबंधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थितीत राहुन योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

          000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ