आपले सरकार सेवा केंद्राची निवडसुची प्रसिध्द; 15 सप्टेंबरपर्यंत तक्रार नोंदवा

 


अकोला,दि.14(जिमाका)-  जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत  क्षेत्रातील रिक्त असणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्राकरीता इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. पात्र झालेल्या उमेदवारांची अंतिम सुची निवड करण्यात आली असून निवड सुचीबाबत आक्षेप असल्यास त्यांची  तक्रार बुधवार दि. 15 सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील महाआयटी कार्यालय येथे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

पात्र उमेदवारांची अंतिम निवड सूची जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांच्या अधिकृत संकेतस्थळावर www.akola.gov.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे. आपले सरकार सेवा केंद्राकरीता निवडण्‍यात आलेल्या उमेदवारांची, जिल्ह्यातील अधिकृत आधार नोंदणी केंद्र संचालकबाबत तसेच आधार संच संचालकांच्याही काही तक्रार, निवेदन किंवा विनंती असल्यास महाआयटी कार्यालयात  बुधवार दि. 15 सप्टेंबरपर्यंत  सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाठवाव्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम