118 अहवाल, शुन्य पॉझिटीव्ह; दोन डिस्चार्ज - रॅपिड ॲन्टीजेनमध्ये शुन्य पॉझिटीव्ह

 


अकोला,दि.13(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 118 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 118 अहवाल निगेटीव्ह तर शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. तसेच दोघांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.12) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57843(43239+14427+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह शुन्य.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 317028 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 313422 फेरतपासणीचे  402  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3204 नमुने होते. आजपर्यंत एकूण 317028 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 273789 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शुन्य पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, याची नोंद घ्यावी.

दोन जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथील दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 

17 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57843(43239+14427+177) आहे. त्यात 1136 मृत झाले आहेत. तर 56690 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 17 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 113 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.12) दिवसभरात झालेल्या 113 चाचण्या झाल्या त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात अकोला महानगरपालिका येथे 88, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 25  चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 113 जणांच्या चाचण्या होऊन त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आले.

                                       ०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन