यु.पी.एस.सीः‘कठीण’ आहे पण ‘अशक्य’ नाही; जिल्ह्यातील यशस्वी उमेदवार आश्विन राठोड यांच्यासोबत संवाद

 


 

(अकोला जिल्ह्यातील रहिवासी असलेले आश्विन  राठोड यांनी नुकतेच यु.पी.एस.सी परीक्षेत यश संपादन केले. या परीक्षेबाबत तसेच या यशापर्यंत त्यांना नेणारा परीश्रमांचा प्रवास जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी केलेली बातचीत.)

 

प्रश्न : आपण आय.ए.एस. व्हावे असा विचार मनात कधी विचार आला व त्याकरीता  सुरुवातीपासुन काय नियोजन केले?

उत्तर : शालेय शिक्षण घेत असतांना मी आय.पी.एस. होण्याचे स्वप्न बाळगून होतो. पुढे बी.एस.सी करत असतांना  व युपीएससी परीक्षेची  पूर्व तयारी करताना आय..एस. होण्याचे मनापासून  ठरविले. बी.एस.सी. अभ्यासासोबतच यु.पी.एस.सी परीक्षेची   पुर्वतयारी सुरु केली. यासाठी बेसीक अभ्यास, भरपूर वाचन व सरावावर भर दिला.

 

प्रश्न : यु.पी.एस.सी. परीक्षेकरीता कशाप्रकारे पूर्व तयारी केली?

उत्तर : यु.पी.एस.सी.करीता स्वत:मध्ये विश्वास असणे आवश्यक आहे. विषयाच्या अवास्तव वाचनापेक्षा मुलभूत अभ्यासक्रम व माध्यमावर भर देवून जास्तीत जास्त सराव केला.

 

प्रश्न : आपण कोणत्या शाखेतून शैक्षणिक अर्हता पूर्ण केली. या अभ्यासक्रमाचा यु.पी.एस.सी. परीक्षेकरीता

           किती व कसा फायदा झाला?

उत्तर : शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विज्ञान शाखेत वनस्पतीशास्त्र (बॉटनी)प्राणीशास्त्र(झूलॉजी) विषय घेतले.त्याच विद्याशाखेत बीएससी ही पदवी पूर्ण केली. त्याचा फायदा मला प्रत्यक्ष परीक्षेची तयार करतांना झाला.

 

प्रश्न : यु.पी.एस.सी. मुख्य परीक्षेसाठी कोणकोणते विषय घेतले व ते घेण्यामागचा उद्देश काय होता?

उत्तर : यु.पी.एस.सी. परीक्षेसाठी मुख्य विषय वनस्पतीशास्त्र व पर्यायी विषय प्राणीशास्त्र हा होता. हेच माझ्या पदवीचे विषय असल्याने ते आवडीचे विषयही होते. त्याचा अभ्यास करणे माझ्यासाठी सोईचे होते, म्हणून या विषयांची निवड केली.

 

प्रश्न :युपीएससी परीक्षेकरीता कोणाचे मार्गदर्शन घेतले? परीक्षेची तयारी कुठे व कशी केली?

उत्तर : यु.पी.एस.सी.  रीक्षेची तयारी मी दिल्ली येथे  केली. या रीक्षेकरीता माझे शिक्षक, युपीएससी परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक तसेच माझे सिनीयर, तसेच माझे मित्रमंडळी व आई-वडीलांचा खूप मोठा वाटा आहे. या परीक्षेसाठी मी जास्तीत जास्त भर सरावावर दिला.

 

प्रश्न :तुम्ही अकोला जिल्ह्याचे आहात; आपल्या जिल्ह्यात युपीएससी परीक्षा देण्यासाठी कितपत पोषक

         वातावरण आहे?

उत्तर : माझे शालेय शिक्षण अकोला जिल्ह्यात झाले. जिल्ह्यात यु.पी.एस.सी. पूर्वतयारी करीता आवश्यक पोषक

          वातावरण नाही. परंतु कठीण परिश्रम व प्रयत्नाने यु.पी.एस.सी. पूर्वपरीक्षा देवू शकता. या रीक्षेच्या मार्गदर्शनासाठी शासनही  अनेक उपक्रम राबवित आहे. तसेच ऑनलाईन, युट्युब सारख्या माध्यमाव्दारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन परीक्षार्थी आपला अभ्यास करु शकता.

 

प्रश्न : यु.पी.एस.सी. परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल?

उत्तर : यु.पी.एस.सी. रीक्षा ही कठीण परीक्षा आहे परंतु अक्य नाही. परीक्षेची पूर्वतयारी करताना कठीण परिश्रमांसोबत स्मार्ट वर्क आवश्यक आहे. यु.पी.एस.सी. ची तयारी करताना आत्मविश्वास, सातत्य, सराव अभ्यासक्रमावर भर द्यायला हवा. तसेच आपल्याकडे अभ्यासाचे जे मुळ स्त्रोत( शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके, एनसीईआरटीची पुस्तके इ.) आहेत, त्यांचाही वापर अधिकाधिक करायला हवा. सराव जास्तीत जास्त करा, कमी पण चांगले मित्र बनवा व ज्या व्यक्तीसोबत आहात तो तुम्हाला सकारात्मक विचाराचा व प्रोत्साहित करणार असावा. सर्वात महत्वाचे परीक्षेची तयारी करताना स्वत:वर विश्वास ठेवून यु.पी.एस.सी. हेच आपले  ध्येय असावे.

-शब्दांकनः सतिश बगमारे, माहिती सहायक, जिमाका, अकोला.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ