आरोग्य विभागाची सरळसेवा पदभरती; वर्ग क व ड पदाकरीता 55 केंद्रावर होणार परिक्षा

 

  

अकोला,दि.24(जिमाका)- सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट-क व ड वर्गातील सरळसेवा पदभरती परिक्षा शनिवार व रविवार दि. 25 व 26 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील 55 परिक्षा केंद्रावर होणार आहे. परिक्षा केंद्रावर गैरप्रकार, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये व परिक्षा शांततेत पार पाडण्याकरिता दि. 25 व 26 सप्टेंबर रोजी सकाळी सहा ते सायंकाळी सहावाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या आतील संपुर्ण परिसरात व केंद्राचे बाहेरिल लागून असलेल्या 100 मीटर परिसरात कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी संजय खडसे यांनी निर्गमित केले आहे.

परिक्षा केंद्रावर प्रतिबंधात्मक उपाययोजना

परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरित्या प्रवेश करता येणार  नाही, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाही. परिक्षा केंद्रावर प्रवेश करणाऱ्या सर्व परिक्षार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे थर्मल, इफ्रारेड थर्मामिटरद्वारे तापमान तपासण्यात येईल. सर्व पर्यवेक्षकांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करणे अनिवार्य राहिल. हवा खेळती राहण्याच्या दृष्टीने परिक्षा केंद्रावरील सर्व खिडक्या तसेच दरवाजे उघड्या ठेवाव्या. सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच परिक्षार्थी यांना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. परिक्षार्थी यांना ओळखपत्र असल्याशिवाय व मास्क लावल्याशिवाय प्रवेश दिल्या जाणार नाही. प्रत्येक परिक्षार्थी मध्ये किमान तीन फुटाचे अंतर राहील. परिक्षा केंद्राचे प्रवेशद्वारासमोर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येईल. परिक्षा केंद्राच्या परिसराची सोडियम हायपोक्लोराईटच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण करण्यात यावे. कोणत्याही परिक्षार्थी, अधिकारी, कर्मचारी यांना कोव्हिड-19 ची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ नजीकच्या रुग्णालयात भरती करावे. परिक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेत बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यात येणार नाहीत. परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशीन, पानपट्टी, लॅपटॉप, टायपिंग सेंटर एसटीडी बुथ, ध्वनीक्षेपक इत्यादी माध्यम परिक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात येईल.

        परिक्षा केंद्राचे परिसरात इंटरनेट, मोबाईल, फोन, सेल्युलर, प्लॅन ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यात मनाई राहील. परिक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्ती, वाहनास प्रवेशास मनाई राहील. वरील प्रतिबंधात्मक आदेश परिक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी, परिक्षार्थी तसेच परिक्षा केंद्रावर देखरेख करणारे अधिकृत अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी यांचे बाबत परिक्षा संबंधीत कर्तव्य पार पाडण्याचे दृष्टीने लागू राहणार नाहीत, अशी माहिती आदेशाव्दारे कळविण्यात आले.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ