352 अहवाल, एक पॉझिटीव्ह; एक डिस्चार्ज
अकोला,दि.2(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच
वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 352
अहवाल प्राप्त झाले. त्यातील 351 अहवाल निगेटीव्ह, एकाचा
अहवाल पॉझिटीव्ह आला तर एकाला डिस्चार्ज देण्यात आला, असे
जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.1) रॅपिड
ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या
57824(43226+14421+177) झाली आहे, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे
एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक = एकूण पॉझिटीव्ह दोन.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 314093 नमुने
तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 310501 फेरतपासणीचे
402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3190 नमुने होते.
आजपर्यंत एकूण 314093 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 270867 आहे, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
एक
पॉझिटिव्ह
आज
दिवसभरात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एका
पुरुषाचा समावेश असून हा रुग्ण अकोला मनपा
क्षेत्रातील रहिवासी आहे. दरम्यान रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात
एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, याची
नोंद घ्यावी.
एक
डिस्चार्ज
दरम्यान
आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एका रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
16 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात
एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57824(43226+14421+177) आहे. त्यात
1136 मृत झाले आहेत. तर 56672 जणांना डिस्चार्ज देण्यात
आला असून सद्यस्थितीत 16 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली
आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा