380 अहवाल, एक पॉझिटीव्ह; रॅपिड ॲन्टीजेनमध्ये दोन पॉझिटीव्ह
अकोला,दि.10(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच
वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 380 अहवाल प्राप्त झाले. त्यातील
379 अहवाल निगेटीव्ह तर एक अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि. 9) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये दोन अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57838(43234+14427+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
आजचे
एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक +
रॅपिड ॲन्टीजेन चाचणी दोन =
एकूण पॉझिटीव्ह तीन.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत
एकूण 316335 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 312730 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3203 नमुने
होते. आजपर्यंत एकूण 316375
अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 273131 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
एक
पॉझिटिव्ह
आज
दिवसभरात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एका महिलेचा समावेश असून ती अकोला
मनपा क्षेत्रातील आहे. दरम्यान रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला, याची
नोंद घ्यावी.
20
जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात
एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57838(43234+14427+177) आहे. त्यात
1136 मृत
झाले आहेत. तर 56682 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 20 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड
ॲन्टीजेन चाचण्याः 134 चाचण्यात दोन पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग
चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.9) दिवसभरात
झालेल्या 134 चाचण्या झाल्या त्यात दोन अहवाल
पॉझिटीव्ह आला, अशी माहिती
जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात मुर्तिजापूर
येथे 23, अकोला महानगरपालिका येथे 50, हेगडेवार
येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 56 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असे 134 जणांच्या चाचण्या होऊन
त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आले.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा