आपले सरकार सेवा केंद्राकरीता 345 उमेदवारांची निवड


अकोला,दि.10(जिमाका)-  जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत  क्षेत्रातील रिक्त असणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्राकरीता इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये जिल्ह्यातुन 1532 अर्ज  प्राप्त झाले होते.  त्यामधील पात्र ठरलेल्या  345 उमेदवारांचे आपले सेवा केंद्राकरीता निवड झाली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त अर्जाची संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसलिदार व संबंधित निवासी नायब तहसिलदार यांच्या समितीने सादर केलेल्या यादिला जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली आहे. त्यात  आपले सरकार केंद्र मंजूरीबाबत दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य असल्याने अशा 89 दिव्यांग उमेदवारांची 40 टक्के वर अंपगत्व असलेल्याची प्राधान्याने निवड करण्यात आली आहे. एकमेव अर्जदार आहे अशा 47 व एकमेव सीएससी धारक आहे अशा 65 अर्जदारांची निवड करण्यात आली आहे. एकापेक्षा जास्त सीएससी धारकांचे अर्ज आहेत अशा सर्व अर्जदारांना आपले सरकार सेवा केंद्राच्या मंजूरीबाबत माहिती तंत्रज्ञान विभागाच्या निर्देशानुसार मागिल सहा महिन्यांचे (1 सप्टेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021) सीएससीचे बीटूसी व्यवहार जास्त आहेत अशा 144 अर्जधारकांची अटी व शर्तीचे पुर्तता केलेल्या उमेदवाराची निवड करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची अंतिम निवड सूची जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांच्या अधिकृत संकेतस्थळावर www.akola.gov.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समितीचे सचिव संजय खडसे यांनी दिली.

000000 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ