पोळा सण घरीच साजरा करा; जिल्हाधिकारी निमा अरोरा

 


अकोला,दि.3(जिमाका)-  पोळा(पिठोरी पट) हा सण शहरी व ग्रामिण भागामध्ये तसेच शेतकरी वर्गाकडुन मोठया प्रमाणात साजरा करण्यात येतो. कोरोना पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेवून पोळा सण घरीच साजरा करा, असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

यासंदर्भात आदेशात म्हटल्यानुसार,  पोळा हा सण प्रत्‍येकांनी आपआपल्‍या घरीच बैलांचे पुजन करून व पुजा अर्चना करून साजरा करावा, पोळा हा सण साजरा करण्‍याकरीता सामुहिकपणे एकत्र येता येणार नाही,  ज्‍या क्षेत्रामध्‍ये पारंपारीक पध्‍दतीने पोळा सण साजरा करण्‍याकरीता नागरीक एकत्र येत असतात अशा     क्षेत्राचे ठिकाणी कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्‍मक आदेश लागु करण्‍यात येत आहे. बैलांना सजवुन त्‍याची मिरवणूक काढता येणार नाही, वाद्य, ढोल, ताशे अथवा ध्‍वनीक्षेपकाचे कोणतेही साधन वापरण्‍यावर पूर्णत:निर्बंध राहील, बैलांची शर्यत, बक्षीस स्‍पर्धा, घरोघरी बैलांना घेवून जाणे इत्‍यादीवर पूर्णंत: निर्बंध राहील.

            या आदेशाची अंमलबजावणी शहरी भागाकरीता आयुक्‍त, अकोला महानगरपालीका, उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच नगर परिषद व नगर पंचायतीकरीता संबधित मुख्‍याधिकारी व संबधित पोलीस निरीक्षक आणि ग्रमिण भागाकरीता संबधित तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी करावी. आदेशाची पालन न करणाऱ्यावर  दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.

000000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ