386 अहवाल, तीन पॉझिटीव्ह; सहा डिस्चार्ज - रॅपिड ॲन्टीजेनमध्ये शुन्य पॉझिटीव्ह
अकोला,दि.12(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)
कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 386 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 383 अहवाल
निगेटीव्ह तर तीन अहवाल पॉझिटीव्ह आला. तसेच सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.11) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57843(43239+14427+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
आजचे
एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर तीन +
रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य =
एकूण पॉझिटीव्ह तीन.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत
एकूण 316910 नमुने
तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 313304
फेरतपासणीचे 402
तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3204 नमुने
होते. आजपर्यंत एकूण 316910 अहवाल
प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 273671 आहे, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
तीन
पॉझिटिव्ह
आज
दिवसभरात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश
असून ते अकोला मनपा क्षेत्र, अकोला ग्रामीण व पातूर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी
आहे. दरम्यान रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह आला, याची
नोंद घ्यावी.
सहा जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात होम आयसोलेशन येथीील सहा जणांना डिस्चार्ज
देण्यात आला, अशी माहिती जिल्हा
रुग्णालयातून देण्यात आली.
19
जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात
एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57843(43239+14427+177) आहे. त्यात
1136 मृत
झाले आहेत. तर 56688 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 19 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड
ॲन्टीजेन चाचण्याः 132 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग
चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.11) दिवसभरात
झालेल्या 132 चाचण्या झाल्या त्यात शुन्य
अहवाल
पॉझिटीव्ह आला, अशी माहिती
जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात
अकोला महानगरपालिका येथे 87, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 44, हेगडेवार येथे एक चाचणी झाली
त्यात
कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 132 जणांच्या चाचण्या होऊन
त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आले.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा