आरटीपीसीआर आणि रॅपिड चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह
अकोला,दि.26(जिमाका)-
आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच
वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 294 अहवाल प्राप्त झाले. ते सर्व
अहवाल निगेटीव्ह आले, असे
जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच
प्रमाणे काल (दि.25) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57859(43253+14429+177) झाली आहे,
अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय
सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर
शुन्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह शुन्य
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 321337 नमुने
तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 317423 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3218 नमुने होते. आजपर्यंत एकूण 321337 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण
निगेटीव्ह अहवालांची संख्या 278084 आहे, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शुन्य पॉझिटिव्ह
आज दिवसभरात आरटीपीसीआर व रॅपिड
ॲन्टीजेन चाचण्यात शुन्य अहवाल
पॉझिटीव्ह आला, याची नोंद घ्यावी.
18 जणांवर उपचार
सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह
अहवालांची एकूण संख्या 57859(43253+14429+177) आहे. त्यात 1136 मृत झाले आहेत. तर 56705 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 18
जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 130 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट
राबविण्यात येत आहे. यात काल (दि.25) दिवसभरात झालेल्या 130 चाचण्या झाल्या त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला,
अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात मुर्तिजापूर येथे एक, अकोला महानगरपालिका येथे 90, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 18, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 18,
हेगडेवार लॅब येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल
पॉझिटीव्ह आला नाही, असे 130 जणांच्या
चाचण्या होऊन त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा